Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील रक्ताचे नमुना घेण्याबाबत तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात मोठी माहिती; CCTV नसलेल्या...

Pune Porsche Accident: सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली.

सनिल गाडेकर

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्याच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि गटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झालेला आहे. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

कोठडीत पाच जूनपर्यंत कोठडीत वाढ :

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.

रक्ताचे नमुने फेकून दिले नाहीत :

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे. तर मुलाचे नमुने डॉ. हाळनोर याने कचराकुंडीत फेकून न देता कुणाच्या तरी ताब्यात दिले आहे. हे नमुने नेमके कुणाच्या ताब्यात देण्यात आले याचा पोलिस शोध घेत आहे, असे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी नमूद केले.

रक्त घेतलेली महिला कोण?

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी मूलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही महिला कोण आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही या महिलेचा तपास करत असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

आणखी संशयीतांना अटक होणार :

कल्याणीनगरमधील गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत अनेकांचे सीडीआर तपासले आहेत. त्यातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, अशी माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT