सावरी शिंदे sakal
पुणे

Pune : पावर लिफ्टिंग क्लासिक एशियन चॅम्पियनशिप मध्ये सावरी शिंदेला कास्यपदक

सावरी ही अकरा महिन्यांची असताना एका अपघातांमध्ये तिचे पितृछत्र हरपले.

शीतल बर्गे.

बालेवाडी : अपरिमित परिश्रम, जिद्द व आईच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर बाणेर येथील सावरी शिंदे हिने नुकत्याच दुबई येथे झालेल्या पावर लिफ्टिंग क्लासिक एशियन चॅम्पियनशिप २०२२ मध्ये कास्य पदक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

बाणेरची रहिवाशी सावरी शिंदे हिने दुबई येथे (ता. १ डिसेंबर ते ७ डिसेंबर) दरम्यान झालेल्या झालेल्या पावर लिफ्टिंग क्लासिक एशियन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक मिळवत आपल्या देशाबरोबरच बाणेर बालेवाडीचे नाव ही जागतिक स्तरावर उंचावले आहे .

सावरी ही अकरा महिन्यांची असताना एका अपघातांमध्ये तिचे पितृछत्र हरपले. त्यानंतर तिच्या आईने मोठ्या जिद्दीने सावरीचे पालन पोषण तर केलेच पण त्याचबरोबर तिला शिक्षणाबरोबर खेळाकडे कसे नेता येईल यासाठी मेहनत घेतली. सावरीचे विद्या व्हँली शाळेत शिकत असताना गोळाफेक, भालाफेक खेळाची सुरुवात झाली, व आय सी एस सी बोर्डामध्ये या खेळात तिने चांगली कामगिरी करून रेकॉर्ड बनवला. त्यानंतर तिची राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन भोपाळ येथे झालेले स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले .

सावरी सध्या कर्वे रस्ता येथील कमिन्स कॉलेज मध्ये कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात आहे .गेल्या सात वर्षापासून ती गोळा फेक आणि भाला फेक हे खेळ खेळते. या खेळांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठा कडून ऑल इंडिया शॉटपुट साठी निवड करण्यात आली. यात तिने सुवर्णपदक पटकावले . या खेळा साठी तिला कुलविंदरसिंग चीमा मार्गदर्शन करतात. कमिन्स कॉलेजच्या स्पोर्ट्स डायरेक्टर अंजुश्री ऑगस्टिन यांनी तिला सर्वच खेळांमध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला व तिची पावर लिफ्टिंग खेळाची सुरुवात झाली.

प्रशांत जगताप व त्यांचे दहा मित्र हे तिला सध्या पावर लिफ्टिंग साठी मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत .यांच्या मार्गदर्शनाखाली सावरी सोम, बुध, आणि शनिवारी संध्याकाळी ७.३० ते १२.३० या वेळेमध्ये बाणेरहून फातिमा नगर येथे जाऊन पावर लिफ्टिंग चा सराव करते .घरी यायला रात्रीचे दीड वाजतात.यावेळी तिची आई तिच्याबरोबरच असते. पुण्यात सावरीचे तीन काका-काकू व ९० वर्षांच्या आजी ही राहतात या सगळ्यांचे तिला पाठबळ मिळते तसेच या घवघवीत यशामुळे बाणेर बालेवाडी भागांमध्ये सावरीचे चांगलेच कौतुक होत असल्याचे तिच्या आई मोहिनी शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT