child marriage esakal
पुणे

Pune : वधू-वरांसह तब्बल दीड हजार वऱ्हाडींनी घेतली बालविवाह रोखण्याची सामुदायिक शपथ

माजी आमदार सहकार महर्षी (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

डी.के वळसे पाटील

मंचर - भोरवाडी-अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (ता.१) अनोखा मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी बोहल्यावर पाऊल ठेवण्यापूर्वीच बालविवाह रोखण्याची वधू-वरांसह उपस्थित तब्बल दीड हजार वऱ्हाडींनी सामुदायिक शपथ घेतली. या उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

माजी आमदार सहकार महर्षी (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपसभापती संतोष भोर व उद्योजक भरत भोर यांच्या हस्ते झाले.

ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर (ता.आंबेगाव) व कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन (नोबेल पुरस्कार विजेते) नवी दिल्ली यांच्यावतीने बालविवाह होऊ न देण्यासाठी सामुहिक शपथ उपक्रम राबविला. गेल्या १९ वर्षापासून येथे अक्षदाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो.

ज्ञानशक्ती विकास वाहिनी या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे-वळसे पाटील यांनी उपस्थितांना सामुहिक शपथ दिली. “आपण समाजाचे काही देणं लागतो हे सामाजिक भान जपून वऱ्हाडी मंडळीनी आपण यापुढे आपल्या कुटुंबात, नातेवाईकांत व गावात बाल विवाह होऊ देणार नाही.याबाबत जनजागृतीचे काम करणार. अशी शपथ घेऊन चळवळीत सहभाग दर्शविला. यावेळी गर्दीने मंडप फुलून गेला होता.

काळे पाटील म्हणाल्या “मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असेल तरच तो विवाह ग्राह्य धरला जातो. खेळण्या बागडण्याच्या वयात लग्न करणे हा गुन्हा आहे. सर्वानी या विरोधातील चळवळीत सहभागी व्हावे.” याप्रसंगी विकास भोर, अरुणा थोरात,

उद्योजिका सुरेखा भोर, सुषमा शिंदे, संदीप भोर, उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,विष्णू हिंगे, सुरेश भोर,देवदत्त निकम, निलेश थोरात, सचिन पानसरे , आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दिपक भोर, प्रवीण भोर, किरण भोर, उत्तम भोर यांनी व्यवस्था पाहिली.

बालविवाह थांबविण्यासाठी राज्य शासनाने कायदा केला आहे. त्यासाठी अनेक उपक्रमही राबविले जात आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांत बालविवाह रोखण्यासाठी अजून यश आले नाही. ही चळवळ आत्ता जनतेनेच हातात घ्यावी म्हणून गाव, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडे बाजार, यात्रा, शाळा, महाविद्यालयात जनजागृतीचे काम हाती घेतले जाणार आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT