Pune Priyanka dhumal gets 185th rank in the first class judicial exam 
पुणे

Video : अभिमानास्पद ! पुण्यातील पोलिसाची लेक झाली न्यायाधीश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस लाइनीतील जर्जर झालेल्या इमारती, दिवसा आड येणारे पाणी, विजेच्या तारांचे आणि कोळ्यांचे जाळे, खिडक्‍यांना लावलेल्या ताडपत्री अशी परिस्थिती असतानाही शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील प्रियांका धुमाळ या पोलिसाच्या लेकीने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत तिने 185 वी रॅंक मिळविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूळच्या भोर तालुक्‍यातील पसुरे गावातील पोलिस कर्मचारी संजय धुमाळ यांची ही कन्या. संजय सध्या शिवाजीनगर येथील बॉंम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत आहे. आपल्या मुलीने उच्चशिक्षण घेत समाजाच्या थेट उपयोगाला पडेल अशा श्रेत्रात करिअर करावे अशी त्यांची इच्छा होती. प्रियांका यांनी न्यायाधीश बनत ही इच्छा पूर्णत्वास नेली आहे.

पुणे : मिलिटरी इंजिनरीगमध्ये अपघात; दोन जवानांचा मृत्यू

प्रियांका म्हणाल्या,""माझ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम माझ्या वडिलांनी केले. त्यांनीच मला ध्येयाकडे जाणारा मार्ग दाखवला आणि त्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली.'' मुलगी न्यायाधीश बनल्याच अभिमान वाटत असल्याचे प्रियांकाच्या आईने सांगितले. 

दहावी पास आहात? 56 हजरांची नोकरी वाट पाहतेय !

शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या ग्रंथालयात प्रियांकाने अभ्यास केला. दहावीपासून ती या ग्रंथालयात विविध परीक्षांची तयारी करत आहे. बारावीनंतर प्रियांकाने पाच वर्षाच्या "एलएलबी'या कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेव्हापासून आवश्‍यक सर्व विषयांची टिपणे स्वतःच तयार केली. पुढे गणेश शिरसाट यांचे मार्गदर्शन तिला लाभले. मागील पाच वर्षाच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून तिला हे यश प्राप्त झाले आहे. 



"माझी नेमणूक ग्रामीण भागासाठी झाली तर मला गावकडच्या लोकांसाठी काम करायला आवडेल. गावाकडे तुलनेत कायद्याचे ज्ञान कमी असते. त्यामुळे वकील लोक ग्रामीण अशिलाची बाजू प्रभावीपणे मांडतात का नाही, याची मी काळजी घेईल. तसेच त्या भागातील कायद्याचे सज्ञान वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करेल.'' - प्रियांका धुमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT