डॉ. भागवत कराड sakal
पुणे

Pune : बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढू ; डॉ. भागवत कराड

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. विकसित,आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे हे सर्वांचे मुख्य ध्येय आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे- बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. तसेच, विकसित भारताच्या उभारणीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता. २३) येथे केले.

राज्यातील बांधकाम व्यावसायिक, कर्ज पुरवठादार वित्तीय संस्था आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित अन्य व्यावसायिकांच्या पुण्याजवळील म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत डॉ. कराड बोलत होते. राज्यभरातून सुमारे अडीचशेहून अधिक प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, कोरोनापश्चात काळात बांधकाम व्यावसायिकांसमोर विविध प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सध्याची कर रचना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुशल मनुष्यबळाची कमतरता याबाबत मांडलेल्या समस्यांवर चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढण्यास सरकार कटिबद्ध आहे.

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. विकसित,आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे हे सर्वांचे मुख्य ध्येय आहे. देशाच्या सकल उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा तिसरा क्रमांक आहे. या क्षेत्राने विकसित भारत निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT