pune sakal
पुणे

Pune : विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी प्रा. अभय करंदीकर

डीएसटीचे माजी सचिव एस. चंद्रा शेखर वैयक्तिक कारणास्तव कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याच्या मूळ संस्थेत परतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) सचिवपदी प्रा. डॉ. अभय करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डीएसटीची स्थापना झाल्यापासून दुसऱ्यांदाच सचिवपदी मराठी शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. या आधी १९८६ ते १९९१ या काळात डॉ. वसंत गोवारीकर डीएसटीचे सचिव होते.

डीएसटीचे माजी सचिव एस. चंद्रा शेखर वैयक्तिक कारणास्तव कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याच्या मूळ संस्थेत परतले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरचे संचालक असलेले प्रा. करंदीकर दूरसंचार विषयातील शास्त्रज्ञ आहेत. प्रा. करंदीकर यांची नियुक्ती करताना अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रा. अभय करंदीकर यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा सचिव पदावर नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्याचे वय ६०वर्षे पूर्ण झाल्यापासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते कार्यभार पाहतील.’’ करंदीकर यांची २०१८ मध्ये आयआयटी कानपूरचे संचालक म्हणून नियुक्ती केली होती.

विद्युत अभियंता असलेले प्रा. करंदीकर देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जातात. त्यांच्या संशोधनामुळे ५ जी आणि ग्रामीण ब्रॉडबँडच्या विस्ताराचा समावेश आहे. त्यांनी टेलीकॉम स्टँडर्ड्स डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया नावाच्या देशाच्या दूरसंचार मानक संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प, भारतनेटचे डिझाइन आणि अंमलबजावणीसाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT