Scopus Young Scientist Award Dr Dastgir honored by National Academy  sakal
पुणे

Pune : डॉ. दस्तगीर यांचा नॅशनल ॲकॅडमीतर्फे गौरव

सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आजवर दिलेल्या योगदानाचा अनुक्रमे प्रा. बी.एन.जोहरी पुरस्कार आणि स्कॉपस यंग सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. सईद दस्तगीर यांना असोसिएशन ऑफ द मायक्रोबायोलॉजीस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियाच्या वतीने गौरविण्यात आले आहे.

सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आजवर दिलेल्या योगदानाचा अनुक्रमे प्रा. बी.एन.जोहरी पुरस्कार आणि स्कॉपस यंग सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या शाश्त्रज्ञाला स्कॉपस यंग सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात येते.

गुलबर्गा विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करणारे डॉ. दस्तगीर यांनी कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी येथे पोस्ट डॉक केली आहे. २०१२ पासून ते एनसीएलमध्ये कार्यरत आहे. आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर १३० शोधनिबंध आणि १० अमेरिकन-भारतीय पेटंट त्यांनी प्राप्त केले आहे.

  • डॉ. दस्तगीर यांचे संशोधन

जैवतंत्रज्ञानातील उपयोगासाठी आवश्यक सुक्ष्मजीवांच्या वर्तनाचा आणि भूमिकेचा अभ्यास डॉ. दस्तगीर यांचा संशोधन गट करत आहे. जैव-आधारित रसायनांच्या निर्मितीसाठी भविष्यात मायक्रोबियल सेल फॅक्टरींची उपयुक्तता पडताळत आहे.

आजवर त्यांनी ॲक्टिनोमायसेट्स आणि ॲक्टिनोबॅक्टेरियाच्या ६० हून अधिक नवीन प्रजाती शोधल्या आहेत. ज्यांच्यामध्ये बायोसिंथेसीसची प्रचंड क्षमता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT