crime  sakal
पुणे

Pune : घराच्या प्रवेशद्वारासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याने जातिवाचक शिवीगाळ

कोंढवा पोलिस ठाण्यात 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल, "अ‍ॅट्रॉसिटी" कलमाचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घराच्या प्रवेशद्वारासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याने एका नागरीकास जातिवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना कोंढवा येथे शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली.

सोहेल शेख, रंजित पंडीत, सोहेलचा भाऊ,वडील आणि त्यांच्या 100 ते 150 जणांच्या जमावर बेकायदेशिर प्रवेश करणे, कट रचणे, दरोडा, मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तिने फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर पाच व्यक्ति फटाके वाजवित होत्या. त्यांना फिर्यादिने तेथे फटाके वाजविण्यास विरोध केला. त्याचा राग आल्याने पाच व्यक्तिनी त्यांच्या 100 ते 150 नातेवाईकांना तेथे बोलावले. त्यांनी फिर्यादीस धमकाविले. तसेच फिर्यादीसह त्यांच्या घरातील लोकांना लाथाबुक्क्यांनी, काठ्या, दगड, विटांनी मारहाण करून जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu youth murdered in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या! ; अमानुषपणे मारहाण करून विष प्यायला भाग पाडलं!

MI vs DC WPL 2026 : वॉट अ कॅच..! लिझली लीने अफलातून झेल घेतला, मुंबई इंडियन्सला धक्का बसला; जेमिमा रॉड्रीग्जनेही इतिहास रचला

Ajit Pawar : ‘नऊ वर्षे त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली’; पद्मावती सभेत अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल!

Ajit Pawar : पुण्याला २४/७ पाणीपुरवठा शक्य नाही; व्यापारी मेळाव्यात अजित पवारांचे स्पष्ट मत!

Chandrakant Patil : मोफत शिक्षणाची फाइल अडविणारे मोफत प्रवास कसा देतील? चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल!

SCROLL FOR NEXT