पुणे

साडेतीन लाख मिळकती कराच्या कक्षेबाहेर

CD

पुणे, ता. ४ : शहरात इमारती उभ्या राहतात, त्यांचा वापर सुरू होतो; मात्र मिळकतकराची आकारणी होत नसल्याने महापालिकेचा महसूल बुडतो. अशा कराच्या कक्षेबाहेर राहिलेल्या तीन लाख ७० हजार मिळकतींचा शोध महापालिकेच्या थ्रीडी ट्विन ड्रोन सर्वेक्षणातून लागला आहे. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी किमान १३० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता या मिळकतींवर वापर सुरू झाल्यापासून करआकारणी करून थकबाकी वसूल करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. पुणे शहराच्या सर्वच भागांत निवासी आणि व्यावसायिक बांधकामांचा वेग वाढला आहे. मात्र, नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या तुलनेत मिळकतकराच्या नोंदी होण्याचे प्रमाण कमी आहे. नियमानुसार, बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक किंवा मिळकतधारकाने करआकारणीसाठी अर्ज करणे अपेक्षित असते. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी करून कर निश्चित केला जातो. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अनेक मिळकती कराच्या कक्षेत येत नाहीत. काही ठिकाणी मिळकतकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, तर काही ठिकाणी प्रशासकीय मर्यादांमुळे करआकारणी रखडत आहे. परिणामी, महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात सुमारे चार लाख मिळकतींची नोंदच झालेली नाही. त्यातून एक हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाची जबाबदारी महाप्रित संस्थेला दिली आहे. याच कामांतर्गत संपूर्ण शहराचे थ्रीडी ट्विन ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. रस्त्यांवरून फिरणाऱ्या विशेष वाहनांवरील यंत्रणा आणि आकाशातून उडविलेल्या ड्रोनच्या माध्यमातून मिळकतींची माहिती संकलित करण्यात आली. यात इमारतींचे क्षेत्रफळ, निवासी अथवा व्यावसायिक वापर, वापर सुरू झाल्याचा कालावधी आणि करपात्र मूल्य यांचा समावेश आहे. कोणत्या मिळकतींना कर आकारला आहे आणि कोणत्या मिळकती कराच्या कक्षेबाहेर आहेत, याचीही माहिती एकत्रित केली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मिळकतीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात १३० कोटींचे उत्पन्न
बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर, मुंढवा आणि हडपसर या भागांतील सर्वेक्षणात तीन लाख ७० हजार मिळकतींवर करआकारणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यातून महापालिकेला दरवर्षी सुमारे १३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागांत अशाच पद्धतीने सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ९० मिळकती शोधून त्यांच्याकडून तब्बल ७५ कोटी रुपयांची कर वसुली करण्यात आली होती.

संपूर्ण सर्वेक्षणातून ५५० कोटींची पडणार भर
- शहरात सुमारे १४ लाख मिळकती आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात तीन लाख ७० हजार मिळकती कराच्या कक्षेबाहेर असल्याचे समोर आले आहे.
- उर्वरित मिळकतींचेही अशाच पद्धतीने सर्वेक्षण केल्यास महापालिकेला आणखी सुमारे ५५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
- यंदा मिळकतकर विभागाला तीन हजार ४०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- आतापर्यंत एक हजार ७१० कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित पाच महिन्यांत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान विभागासमोर आहे.
- अशा परिस्थितीत ड्रोन सर्वेक्षणातून समोर आलेल्या मिळकतींवर तातडीने करआकारणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा आधार मिळू शकतो.

मिळकतकर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. थ्रीडी ट्विन ड्रोन सर्वेक्षणाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्याद्वारे कर न लागलेल्या मिळकतींना कर लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.
- प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT