Chandrakant patil Sakal
पुणे

Pune : बालभारती पौड फाटा प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन;त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले..

पुणे महापालिकेने सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा हा वेताळ टेकडीवरून रस्ता आणि एलिव्हेटेड रस्ता प्रस्तावित केले आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - वेताळ टेकडीवरील बालभारती पौड फाटा प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी नागरिकांचे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा या आंदोलक नागरिकांचे म्हणणे काय आहे हे सादरीकरणाद्वारे समजून घेणार आहेत. यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पुणे महापालिकेने सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा हा वेताळ टेकडीवरून रस्ता आणि एलिव्हेटेड रस्ता प्रस्तावित केले आहे. पण या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येणार असून, एवढा मोठा निधी खर्च करून विधी महाविद्यालय रस्त्‍यावरील वाहतूक कोंडी कमी होणार नाही

असा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. १५) हजारो नागरिकांनी मोर्चा काढून त्यांचा विरोध दर्शविला आहे.

महापालिका प्रशासनाकडून सध्या तरी या प्रकल्पाबाबत हालचाली केल्या जात असल्या तरीही प्रकल्प रद्द केलेला नाही. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी त्यांचे आक्षेप नोंदविले असले तरी महापालिकेकडून त्यासंदर्भात काहीच उत्तर मिळत नाही,

त्यामुळे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या नागरिकांचे प्रकल्पाबाबतच्या आक्षेपांचे सादरीकरण पाहणार आहेत. यासंदर्भातील बैठक पुढच्या आठवड्यात होईल,

असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पाटील हे सादरीकरण बघणार आहेत, पण सध्या महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्या घडामोडींना वेग आल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात काय होईल त्यावरही या बैठकीचे भवितव्य अवलंबून आहे, पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तर वेताळ टेकडी बचाव कृती समितीला यासंदर्भात अद्याप कळविण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: दिल तो बच्चा है! संघ हरताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला... KKR च्या सदस्याने काय केलं पाहा Viral Video

Konkan Agriculture: सुपारी उत्पादनाचा पर्यायही घाट्यात; निम्म्यापेक्षा जास्त घट, शासनदरबारी उपेक्षित, खर्च वाढताच

विठुरायाच्या नैवेद्यात उन्हाळी गोडवा! अक्षय तृतीया ते वटपोर्णिमेपर्यंत दररोज आमरस-पूरीचा समावेश

म्हाडाच्या ‘कोकण मंडळा’तील कर्मचाऱ्यांवर ताण, पदे रिक्त असल्याने समस्या

Delhi Punjab Pollution: ‘आयआयटीएम’चा अहवाल धक्कादायक; दिल्ली-पंजाबमधील प्रदूषणामुळे तापमानवाढीचा धोका वाढला, दिल्ली, तातडीच्या उपायांची गरज!

SCROLL FOR NEXT