

Vaibhav Sooryavashi Disappointed
Sakal
Vaibhav Sooryavanshi Emotional Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने दणक्यात सुरुवात केली होती. रियान परागच्या नेतृ्त्वात राजस्थानने पहिले चारही सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर राजस्थानला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे.
राजस्थानला रविवारी (१९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सने ४ विकेट्सने पराभूत केले. हा राजस्थानचा (Rajasthan Royals) हंगामातील दुसरा पराभव होता. या सामन्यात राजस्थानसाठी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) चांगली फलंदाजी केली, पण राजस्थानला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे वैभव अत्यंत निराश झाला होता.