पुणे, ता. ७ : पबमध्ये झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारून त्याच्यावर झाडाच्या फांदीने हल्ला केल्याची घटना विमाननगर परिसरात घडली. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली. ऋतिक मधुकर कोंडे (वय २६, रा. स्वामीनारायण पीजी, गणेशनगर, वडगाव शेरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जेम्स फिलिप मकासरे (वय ४१), प्रिया जेम्स मकासरे (वय ३२, दोघे रा. गांधीनगर, येरवडा), भारत संजय ठाकूर (वय ४०, रा. वानवडी) आणि वेदांत शैलेंद्र भालेराव (वय २६, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ऋतिक हा खासगी कंपनीत कामाला आहे. तो मित्र प्रशांत वर्मासोबत गुरुवारी (ता. ५) नगर रस्त्यावरील फिनिक्स मार्केट सिटी परिसरातील एका पबमध्ये गेला होता. रात्री दहाच्या सुमारास ऋतिक आणि प्रशांत नृत्य करत होते. त्यावेळी ऋतिकने शर्ट काढून हवेत फिरवला. त्यावरून आरोपींशी त्याचा वाद झाला. यानंतर ऋतिक आणि त्याचा मित्र पबमधून बाहेर पडले. आरोपींनी ऋतिकला शिवीगाळ करून रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्यात मारला. तसेच, झाडाच्या फांदीनेही त्याला मारहाण केली. ऋतिकने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.