पुणे

‘पीएमपी’ची वारंवारिता घटली

CD

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ९४ टक्के नागरिकांच्या घरापासून ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध असली, तरी दर पाच मिनिटांनी बस मिळणाऱ्या नागरिकांचे प्रमाण केवळ २१ टक्क्यांवर आले आहे. २०१९ मध्ये हे प्रमाण ६६ टक्के होते. पीएमपीच्या सेवेचा शहरात विस्तार झाला असला तरीही त्या तुलनेत बसेसची संख्या न वाढल्याने सेवेची वारंवारिता घटली आहे. या संदर्भात ‘पीएमपी’ आणि ‘आयटीडीपी इंडिया’ने तयार केलेल्या ‘पीपल निअर ट्रान्झिट २०२६’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

परिवहन आणि विकास धोरण संस्थेने (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी- आयटीडीपी) तीन महिने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जवळ राहणारे किंवा असणारे लोक (पीपल निअर ट्रान्झिट- पीएनटी) प्रणालीद्वारे नागरिकांना त्यांच्या घर, शाळा किंवा कामाच्या ठिकाणापासून ४०० ते ८०० मीटर अंतरावर बससेवा किती सहज आणि वारंवार उपलब्ध आहे, याचे विश्लेषण केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून, त्या ४५० हून अधिक मार्गांवर चालवल्या जातात. सध्या केवळ बीआरटी मार्गावरच बसेसची वारंवारिता चांगली आहे. बीआरटीवर दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होत असून वेळेतही बचत होत आहे.

पुनर्नियोजन करण्याची गरज
पीएमपीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या बहुतांश भागात सेवा विस्तारली असली तरीही पुणे व पिंपरीत १६ भागांत पुरेशी बससेवा नाही. येथील लोकसंख्या अधिक असली तरीही पीएमपीची सेवा तोकडी आहे. या परिसरात बसेसची वारंवारिता वाढवणे आणि मार्गांचे पुनर्नियोजन तातडीने करणे गरजेचे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

येथे अपुरी सेवा
- पुणे : हांडेवाडी, कोंढवा, बाणेर, धानोरी, धायरी, कोथरूड, आंबेगाव आणि वडगाव शेरी
- पिंपरी-चिंचवड : आकुर्डी, भोसरी, चिखली, एमआयडीसी, रहाटणी, सांगवी, तळवडे आणि वाकड.

काय आहे स्थिती?
-पुणे व पिंपरी-चिंचवडमधील केवळ २० टक्के रोजगार केंद्रांजवळ दर पाच मिनिटांनी बस
- शहरातील फक्त ३० टक्के शाळांजवळ दर पाच मिनिटांनी बससेवा उपलब्ध
- ३७ टक्के अधिसूचित झोपडपट्ट्यांजवळ दर पाच मिनिटांनी बस
- शहरातील केवळ ४७ टक्के बसथांबे सुरक्षित व सलग पादचारी मार्गांनी जोडलेले

पुणे आणि पिंपरीतील वाढत्या लोकसंख्येला पुरेशी सेवा देण्यासाठी एक हजार सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीएम ड्राईव्ह योजनेंतर्गत आणखी एक हजार ई-बस ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासी सेवेतील तफावत दूर होण्यास मदत होईल.
- महेश आव्हाड,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

आम्ही विविध भागांत फिरून पीएमपीच्या सेवेचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. पीएमपीच्या मार्गांत वाढ झाली आहे, मात्र वारंवारिता घटली आहे. त्यासाठी बससंख्येचे प्रमाण वाढले पाहिजे. बसगाड्यांच्या मार्गांचे पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे.
- जगदीश टेमकर,
सहयोगी, आयटीडीपी इंडिया

तुमचे मत मांडा...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज असताना १६ ठिकाणी अपुरी बससेवा आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत असून याकडे पीएमपी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT