Vijay Shivtare esakal
पुणे

Pune : पुरंदरचे विमानतळ होणारच ; विजय शिवतारे

बारामतीत आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले पुरंदर विमानतळ होणे ही गरज आहे,

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : कोणत्यही परिस्थिती पुरंदरचे नियोजित विमानतळ होणारच असून आता 80 टक्क्यांहून अधिक लोक जमिनी देण्यासाठी तयार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

बारामतीत आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले पुरंदर विमानतळ होणे ही गरज आहे, पंधरा जिल्ह्यांसाठी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उपयुक्त ठरणार आहे. त्या बाबत आता सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव असून आता बहुसंख्य जमिनमालक आता जमिन देण्यास तयार आहेत. ही प्रक्रीया वेगाने पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असून शेतक-यांना चांगला मोबदला मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.

विजय शिवतारे विधानसभा लढविणार की लोकसभा असे विचारता या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच घेतील, त्यांचा आदेश आपण मान्य करु, असे त्यांनी नमूद केले.

शिंदे फडणवीस सरकारने गेल्या काही महिन्यात जी विकासाची भरीव कामे केली आहेत, ती लोकांपर्यंत पोहोचविण्याची कामे मी करत आहे. बारामतीच्या विकासाबाबत फक्त बारामतीच सर्व काही नाही, लोकसभा मतदारसंघातील इतर मतदारसंघाच्या विकासाकडे का लक्ष दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.

अजित पवार यांची केली प्रशंसा....

राष्ट्रवादीमध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता कोणी असेल तर अजित पवार आहेत यात वाद नाही. युवकांना निवडणून आणणारे आणि बारकाईने प्रत्येक गोष्ट पाहणारे नेते अजित पवार आहेत. मी जरी त्यांचा विरोधक असलो तरी त्यांच्या काही गुणांचा मी प्रशंसक आहे, माझ्याविरुध्द ते बोलले तरी त्यांच्या विरुध्द मी बोलत नाही,

कार्यकर्त्याला शोधून त्याला ताकद देत मोठे करण्यासह त्याला निवडून आणण्यासाठी जे करावे लागते त्यात महाराष्ट्रात अजित पवारांइतका मोठा माणूस दुसरा कुणी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस अजितदादांनी केलेला उठाव हा पक्का होता हे मी स्वताः पंधरा ते वीस आमदारांच्या तोंडून ऐकलेले आहे. त्या मुळे दादांवर आमदार व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे हे नक्की.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव बदला...

बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पुणे दक्षिण मतदारसंघ असे नाव करावे, अशी मागणी मी केली आहे. असेही शिवतारे यांनी सांगितले. बारामती म्हणजे फक्त बारामती विधानसभा मतदारसंघ नाही हेच पवार कुटुंबियांच्या लक्षात येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. बारामतीच्या टंचाईग्रस्त गावात आजही पिण्याचे पाणी उन्हाळ्यात मिळत नाही मग कसला विकास झाला, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT