hurda party 
पुणे

शेताच्या बांधावर चाललंय काय? हुरडा पार्ट्यांचा धडाका, कोरोनाचे नियम मातीत

पांडुरंग सरोदे

पुणे, ता. 9 : शहरानजीक गावांच्या शिवारात सध्या हुरडा पार्ट्यांनी जोर धरलाय. या पार्ट्यांत क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊन कोरोनासंबंधीचे नियम मातीत घातले जात आहेत. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, वाढदिवस व विविध धार्मिक कार्यक्रमांत नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा असताना, दुसरीकडे हुरडा पार्ट्या मात्र बिनदिक्कतपणे रंगताहेत. यंदा कोरोनामुळे पुण्यातील नागरिक व त्यांची कुटुंबे काही महिने घरामध्ये राहून कंटाळल्याने त्यांच्याकडून दैनंदिन जीवनात थोडासा बदल म्हणून हुरडा पार्ट्यांमध्ये सहभाग घेण्यावर भर दिला जात आहे; परंतु या पार्ट्यांमध्ये कोरोनासंबंधीचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दौंड, शिरूर, हवेली, पुरंदर या तालुक्‍यांमध्ये ज्वारीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी या पट्ट्यांमधील कृषी पर्यटन केंद्रांसह काही शेतकरी शेतावर हुरडा पार्ट्यांचे आयोजन करतात. मागील काही वर्षांपासून काही खासगी व्यक्ती पार्ट्या आयोजित करू लागले आहेत. या पार्ट्या "कॉर्पोरेट' पद्धतीने होताहेत. कृषी पर्यटन केंद्रावर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाचे (मार्ट) नियंत्रण आहे. या केंद्रांकडून शासकीय नियमांचे पालन केले जाते. मात्र काही व्यक्ती "कॉर्पोरेट' पद्धतीने हुरडा पार्ट्या करतात. त्याची कोणाकडेही नोंद नसते किंवा त्यांच्याकडून शासकीय नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.

अशा होतात पार्ट्या

  • हुरडा पार्टीसाठी प्रति व्यक्ती 600 ते 650 रुपये बिल आकारणी
  • सकाळी 10.30 ते दुपारी साडेचारपर्यंत नाश्‍ता, जेवण व हुरडा
  • कोरोनाच्या शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन
  • गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती


यवतजवळील एका हुरडा पार्टीसाठी आम्ही आगाऊ नोंदणी केली. तेव्हा आम्हाला शंभर ते दोनशे नागरिक तेथे असतील असे आयोजकांनी सांगितले होते. प्रत्यक्षात तिथे एक ते दोन हजार नागरिक होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले जात नव्हते.
-मनोज कटारिया, व्यावसायिक

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने दिलेल्या नियमावलीची कृषी पर्यटन केंद्रांकडून अंमलबजावणी केली जाते; परंतु शेतांवर काही जणांकडून होणाऱ्या हुरडा पार्ट्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही.
-बाळासाहेब बराटे, अध्यक्ष, "मार्ट'

कोरोनासंबंधीचे नियम सर्वांना सारखेच आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापूर्वीही आम्ही कडक कारवाई केली आहे. हुरडा पार्टीच्या नावाखाली गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केले जात असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करू.
-अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT