crime  esakal
पुणे

Pune : कव्वालीचा कार्यक्रम बंद अन् हॉटेलमध्ये तोडफोड

त्यामुळे आरोपी चिडले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने कव्वालीचा कार्यक्रम थांबवला म्हणून टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. टोळक्याला समजावून सांगणाऱ्या हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत टोळक्याने बाऊंसरला आणि हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हाताने व खुर्चीने मारहाण केली.

मुंढव्यातील वॉटर्स बार अँड किचन या हॉटेलमध्ये शनिवारी (ता. ५) रात्री दीडच्या समारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सुमीत चौधरी, संकेत सावंत, प्रफुल्ल गोरे, अजय मोरे, फिरोज शेख, अण्णा भंडारी, निखिल वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात निखिल मेदनकर (वय ३२ रा. वाघोली ) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील वॉटर्स बार अँड किचनमध्ये शनिवारी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्री दीडनंतरही हा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे कव्वाली कार्यक्रमाचे संयोजक (इव्हेंट मॅनेजर) निखिल यांनी कार्यक्रम बंद केला. त्यामुळे आरोपी चिडले.

त्यांनी साथीदारांना बोलावून घेतले हॉटेलमध्ये गोंधळ घालून साहित्याची तोडफोड केली. तसेच हॉटेलचे मालक आणि त्यांच्या मावसभावास शिवीगाळ केली. त्यानंतर टोळक्याने बाउंसरला आणि हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हाताने व खुर्चीने मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक आर. व्ही. महानोर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT