उंड्री : "क्वाएट आय" शक्ती कमी लोकांकडे असते. तुम्ही ताकदवान, चपळ असाल आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडे क्वाएट आय असेल, तर तो तुमच्यावर सहज विजय मिळवू शकतो. जगभर या नजरेविषयी शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय धर्माधिकारी यांनी याविषयी माहिती दिली.
डॉ. धर्माधिकारी म्हणाले की, चपळ, वेगवान बास्केटबॉलपटू एका जागी उभा राहून बास्केटमध्ये बॉल टाकून गोल करण्यात असफल होतो. मात्र, अशक्त आणि कमी चपळ खेळाडू सहज बास्केटसमोर उभा राहून हुकमी गोल करतो, तेव्हा आपल्याला ती एक प्रकारची जादू वाटते. खरं, तर ती जादू नसून, त्या खेळाडूला मिळालेली दैवी शक्ती आहे. ती म्हणजे नजर स्थिर. त्याला मिळालेली एक देणगी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आकाशातून उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेताना धनुर्धारी जोर लावून प्रत्यंचा ओढतो. मात्र, तो एक क्षण जेव्हा बाण चिमटीतून सोडायचा नेमका संदेश डोळ्यामार्फत मेंदूपर्यंत पोहोचतो. तो क्षण साधतो, ती त्यांना नजर लाभलेली असते. तो क्षण अगदी मिली सेकंदाच्या अचूकतेने लक्षवेधी बाण सोडतो. त्यासाठी स्थिर नजर आवश्यक असते.
मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढताना सर्जनला अशीच स्थिर नजर आवश्यक असते. मेंदू, हातांचे, डोळ्यांचे कोऑर्डिनेशन करू शकतो. डोळे हातांची हालचाल सुनिश्चित, नियंत्रित नेमकी करण्यासाठी मेंदूसाठी जीपीएस म्हणून काम करतात. क्रिकेटमध्ये बॉल टोलवताना, वेगाने आलेला कॅच घेतानाचा तो एक क्षण डोळ्यामार्फत अचूक टिपला जातो. मेंदूला संदेश फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये संदेश पाठवून हाताला मार्गदर्शन करते, ती स्थिर नजर असते. कॅरम, गोल्फ, टेनिस खेळांमध्ये स्थीर नजर लाभलेले खेळाडू इतरांपेक्षा तुलनेने शारीरिकदृष्ट्या कदाचित अशक्त असतील, तरीसुद्धा यशस्वी होऊन आश्चर्याचा धक्का देतात. धर्नुर्धारी होण्याचे गमक सांगता अर्जुन म्हणाला- पोपटाचा फक्त डोळाच दिसतो. आता प्रयत्नपूर्वक ही स्थिर नजर प्राप्त होऊ शकते, का हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.