pune  sakal
पुणे

Pune : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू, रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची चर्चा

शनिवारी रात्री 11 वाजता घडली घटना, लोहमार्ग पोलिसांकडून असे घडले नसल्याचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बिहारला निघालेल्या रेल्वेमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना शनिवारी रात्री 9 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर घडली. दरम्यान, रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमध्ये प्रवासाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती, त्याविषयी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले.

साजन बलदेव मांझी (वय 30, रा. कानती नवादा, गया, बिहार) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साजन व त्याचा पुतण्या बौधा मांझी (रा.कंटी नवादा, बीथो गया, बिहार ) हे दोघे हि 15 दिवसापूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते. साजन हा आजारी होता. दरम्यान दोघेजण पुणे- दानापूर (पाटणा) रेल्वेने बिहार येथे जाणार होते. संबंधित गाडी फलाट क्रमांक एकवरुन शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रवाना होणार होती. त्या वेळी प्रवासी आणि त्याचे कुटुंबीय सर्वसाधारण डब्यात प्रवेश करत होते.

त्यावेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. साजन हा गाडीमध्ये चढत असताना गर्दीत अडकल्याने व दम लागल्याने त्यास त्रास होऊन तो फलाटावर कोसळला. त्यांचा पुतण्या,लोहमार्ग पोलिस व अन्य प्रवाशांनी त्यास बेशुद्धावस्थेतील प्रवाशाला लाेहमार्ग रुग्णलायात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले.

"संबंधित प्रवासी आजारी होता. बिहारला जाणाऱ्या रेल्वेत चढत असताना दम लागून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तो प्रवासी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचंगरीत मृत्यु झाला, असे काहीही घडले नाही. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्युमागचे कारण समजेल." सदानंद वायसे, पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Action against Koyta Gang Video : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची जिरवली मस्ती; नागरिकांसमोरच बेदम चोपलं!

Kabaddi World Cup: भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात जिंकला तिसरा वर्ल्ड कप; कबड्डीमध्येही मिळवले जगज्जेतेपद

Ambegaon News : एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा मोठा उपक्रम; घोडेगावात ९ हजार विद्यार्थ्यांचा पोषण प्रवास बदलणार!

'या' मराठी सिनेमात धर्मेंद्र यांनी केलं आहे काम ! विक्रम गोखलेंबरोबर शेअर केलेली स्क्रीन

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तणाव

SCROLL FOR NEXT