पुणे

स्वच्छ भारत सर्वेक्षणात पुणे रेल्वे स्थानक चौथे 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रेल्वे मंत्रालयाने "स्वच्छ भारत'अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात सूरत स्थानकाने प्रथम, दादर स्थानकाने दुसरा, तर सिकंदराबाद स्थानकाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

पर्यावरण आणि हाउसकीपिंग (स्वच्छतागृह आणि स्थानकांवरील स्वच्छता) या प्रमुख बाबींवर हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये स्थानकाच्या आवारातील स्वच्छता आणि चांगले पर्यावरणपूरक स्थानक यावर भर दिला होता. 

भारतीय गुणवत्ता परिषदेने देशातील 720 रेल्वे स्थानकांवर हे सर्वेक्षण केले. ज्या स्थानकांचे उत्पन्न 500 कोटींपेक्षा जास्त आणि दोन कोटींपेक्षा अधिक प्रवासी वर्षभर प्रवास करतात, अशा "नॉन सबअर्बन' (एनएसजी 1) प्रवर्गातील स्थानकांचा समावेश होता. यामध्ये मध्य रेल्वेच्या 21 स्थानकांचा समावेश आहे. या सर्वेक्षणातील अन्य प्रकारामध्येही मध्य रेल्वेने बाजी मारली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे रेल्वे स्थानकाच्या यशाबद्दल मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

स्थानक व परिसराच्या स्वच्छतेवर प्रमुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येते. तसेच, प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 
मिलिंद देऊस्कर, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

Shahid Afridi चा 'Hilal-e-Imtiaz' पुरस्काराने गौरव; म्हणाला, हा पाकिस्तानसाठी शत्रूविरुद्ध लढणाऱ्या हुतात्म्यांना समर्पित... Video

SCROLL FOR NEXT