Ai Watch Sakal
पुणे

Railway Ticket : ‘एआय’ रोखणार रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; देशातील पहिलाच प्रयोग

आरक्षित विशेषतः तत्काळ कोट्यातील तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना लगाम लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्याचे ठरविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद कानडे

पुणे - आरक्षित विशेषतः तत्काळ कोट्यातील तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना लगाम लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्याचे ठरविले आहे. चेहऱ्यावरील हावभाव, संशयास्पद हालचाली आढळल्यास आरक्षण केंद्रावरील प्रणालीत अलार्म वाजेल. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीला पकडणे सोपे होईल. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुणे स्थानकावर कार्यान्वित करण्यात येणार असून, हा देशातील पहिलाच प्रयोग असणार आहे.

जिओ थिंक सर्व्हिलन्स सोल्यूशनतर्फे पुणे रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्रातील खिडक्यांवर ‘एआय’चे दोन कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्या रांगेत तिकीट काढण्यासाठी येणाऱ्यांवर ‘एआय’ची नजर असेल. व्यक्तीच्या हालचाली आणि हावभाव सामान्य न वाटल्यास कॅमेरे त्याचे चित्रण करून त्याचा रेकॉर्ड तयार करेल. त्यानंतर लगेच आरक्षण केंद्रावर बसविलेली अलार्म सिस्टिम वाजेल. संबंधित व्यक्ती जर काळाबाजार करण्याच्या उद्देशाने ते तिकीट काढत असेल, तर त्यास तत्काळ अटक केली जाईल. येत्या दोन महिन्यांत पुणे स्थानकावर ही प्रणाली कार्यान्वित होईल. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मदत झाली, तर देशभर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाऊ शकते.

पुणे स्थानक दृष्टिक्षेपात...

  • ९ एकूण खिडकी

  • सुमारे १५०० दैनंदिन आरक्षित तिकिटांची संख्या

  • सुमारे ५० हजार पुणे स्थानकावर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या

  • दीड लाख एकूण प्रवासी संख्या

  • २५० रेल्वेगाड्या

फायदे काय?

1) रांगेतील संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याची नोंद ठेवून अलार्म वाजेल.

2) वारंवार येणाऱ्या व्यक्तीदेखील चटकन लक्षात येतील.

3) प्रवाशांची रांग वाढली तरीही अलार्म वाजेल.

4) रांग वाढल्यास गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जातील.

प्रायोगिक तत्त्वावर पुणे स्थानकावरील आरक्षण केंद्रात ‘एआय’चे दोन कॅमेरे बसविले जातील. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मदत होईल. संशयित व्यक्तीवर नजर ठेवणे आणि त्याचा डेटा तयार करणे सोपे होईल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT