पुणे

Pune Rain: चास-कमान धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain News : श्रेणी एक ए. के. पवार, सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

राजेंद्र लोथे

Khed Latest News: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून भिमा नदिपात्रात २९७९० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरण 96.99 टक्के भरलेले असल्याने अतीरिक्त ठरणारे पाणी लगेच नदिपात्रात सोडण्यात येत असल्याने नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने सहाय्यक अभियंता श्रेणी एक ए. के. पवार, सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सर्वप्रथम २५ जुलै रोजी धरणाची पाचही दारे पुन्हा उघडण्यात येवून एकुण पाच दरवाज्याव्दारे ४५४५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र त्यानंतर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेत पाण्याचा विसर्ग कमी वा जास्त करण्यात येत होता.

मात्र शनिवार ता. ३ रोजी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त झाल्याने रात्री धरणातून १५०९५ क्युसेक्स वेगाने पाणी भिमा नदिपात्रात सोडण्यात आले मात्र त्यानंतरही आवक वाढत राहिल्याने धरणातून पाचही दरवाज्यामार्गे १९९०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली होती. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने व धरणाचा पाणीसाठा शंभर टक्याजवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणात पाण्याची होणारी आवक आणी विसर्ग सारखाच ठेवला जातोय.

सद्य स्थितीत पाण्याची आवक वाढल्याने रविवारी ४ तारखेला सकाळी पाचही दरवाज्याव्दारे भिमा नदिपात्रात २९७९० क्युसेक्स वेगाने विसर्ग होत असून विजनिर्मीतीनंतर अतीवाहकाव्दारे नदिपात्रात ३७५ क्यसेक्स व दरवाज्यातून २९९७० असा एकूण ३०१६५ क्युसेक्सने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविला जाऊ शकतो त्यामुळे नदिकाठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांनी दिली आहे. चास-कमान धरण परिसरात एक जुनपासून ७१० मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT