पुणे

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या - हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने फळबागा व इतर नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने द्राक्षे,केळी, डाळिंब आदी फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यात ७० ते ८० मिली मीटर एवढा उच्चांकी पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात डिसेंबर महिन्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे फळबागा व इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी झालेल्या आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अजूनही कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने केळी सह शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळालेला नाही. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनानेअवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT