Pune Rain sakal
पुणे

Pune Rain : बारामती तालुक्यात कऱ्हा नदीला पूर

नाझरे धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरून वाहू लागल्यामुळे कऱ्हा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे

मिलिंद संगई बारामती

बारामती : नाझरे धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरून वाहू लागल्यामुळे कऱ्हा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.त्याचा परिणाम म्हणून बारामती तालुक्यात नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या गावातील अनेक घरांना फटका बसला असून या घरातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम काल रात्रीपासूनच प्रशासनाने सुरू केले होते.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह अनेकांनी बारामती तालुक्यात नदीपात्राच्या कडेला असलेल्या अनेक गावांमध्ये फिरून नागरिकांचे स्थलांतर व मदत कार्याचा आढावा घेतला.दरम्यान जळगाव कडेपठार ते काऱ्हाटी दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे बारामती पुणे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. कऱ्हा वागज, अंजनगाव, गुणवडी यासह बारामती शहरातील पंचशील नगर व इतर ठिकाणच्या आणि कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर प्रशासनाने सुरू केले आहे.

धरणातून सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीला अधिक पाणी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने आता तयारी सुरू केली असल्याची माहिती दादासाहेब कांबळे यांनी दिली. पोलीस प्रशासनही या स्थितीला हाताळण्याच्या दृष्टीने सज्ज आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने बारामती तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बारामती शहर परिसरात देखील रात्रभर मोठा पाऊस झाला सध्या पावसाने बारामतीच्या व्यापार पेठेवरही विपरीत परिणाम होत आहे. दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापारी आता चिंताग्रस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT