Pune Rain sakal
पुणे

Pune Rain: पुणेकरांनो लक्ष द्या! भोर-पुणे मार्ग वाहतुकीसाठी बंद, वाचा काय आहे पर्यायी मार्ग

Rain Latest Update: सांगवी ते हरतळी गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी, पुणे-भोर वाहतूक सारोळा शिंदेवाडी मार्गे वळविण्यात आली.

विजय जाधव

Bhor Latest Update: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा देवघर आणि भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. नीरा नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली आहे.

रविवारी (ता.४) दुपारी भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या सांगवी गुमा आणि हरतळी (ता खंडाळा जिल्हा सातारा) या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागले असल्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे भोर - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

रविवारी सकाळी फुलाच्या दोन फूट खाली पाणी होते. परंतु पावसाचा जोर असल्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.

रविवारी दुपारी अडीच वाजता पुलावरून पाणी वाहू लागले. याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन पाटील यांनी पुल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आणि सांगवी च्या ग्रामस्थांनी लगेच पुलाच्या दोन्ही बाजूकडे बांबू लावून फुल वाहतुकीसाठी बंद केला.

हरतळी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोरहून पुण्याला जाणारी वाहतूक ही भोर -शिंदेवाडी-सारोळा-कापूरहोळ मार्गे वळविण्यात आली आहे.

- अरुण कदम, निवासी नायब तहसीलदार भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT