NCP Protest  Sakal
पुणे

Video : बोट दाखवेल तिथे 'बोट' सेवा; राष्ट्रवादीच्या पुण्यातील आंदोलनानं लक्ष वेधलं

पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरक्षः झोडपून काढलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

NCP Protest In front Of PMC : पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरक्षः झोडपून काढलं आहे. यामुळे ठिकठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सर्वांमध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे पुणे महापालिकेसमोर करण्यात आलेल्या उपहासात्मक मागणीच्या आंदोलनाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलेले हे आंदोलन भर पावसात करण्यात आले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट खरीखुरी बोटचं आणली होती.

त्याचे झाले असे की, रविवारी पुणे शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे शहरातील अनेक भागांसह रस्त्यारस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याच गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आज महापालिकेसमोर बोट आणत अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी या समस्येतून सामान्या नागरिकांची सुटका व्हावी याकरता बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे अशी उपहासात्मक मागणी करण्यात आली. तसेच पुढील काळात सार्वजनिक वाहतूकीसाठी बोटीचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचीही मागणी करण्यात आली. आंदोलनासाठी पक्षाकडून खरीखुरी बोट आणण्यात आल्याने सध्या शहरभर या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनानंतरतरी प्रशासनाला जाग येणार का? आणि पाणी तुंबण्याच्या समस्येवर ठोस अशी उपाययोजना केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat : सलग सुट्ट्यांमुळे सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट जाम होणार? एकाच लेनमधून सुरू आहे वाहतूक, 'या' वळणावर अपघाताचाही धोका!

Kalyan-Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपावरून युतीत अनिश्चिततेचे ढग; 73 जागांच्या मागणीने युतीत तणाव !

Panchang 26 December 2025: आजच्या दिवशी

वाहतूक समस्येला ‘लोकवैज्ञानिक’ पर्याय

Healthy Bengali Shukto: हलकी गोडसर चव, सुगंधी मसाले आणि पौष्टिक भाज्यांसह; हिवाळ्यासाठी तयार करा आरोग्यदायी बंगाली शुक्तो

SCROLL FOR NEXT