Pune Rain News sakal
पुणे

Pune Rain News :" कॅबवाल्यांनी पावसात प्रवाशांना ‘धुतले’

रस्त्यांवर अडकलेल्या प्रवाशांनी ‘कॅब’ बुक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना किमान ४० मिनिटांची प्रतीक्षा करावी लागती होती, तर २ किलोमीटरच्या प्रवासासाठी त्यांना ४०० ते ५०० रुपयांचे भाडे द्यावे लागत होते.

सकाळ वृत्तसेवा

रस्त्यांवर अडकलेल्या प्रवाशांनी ‘कॅब’ बुक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना किमान ४० मिनिटांची प्रतीक्षा करावी लागती होती, तर २ किलोमीटरच्या प्रवासासाठी त्यांना ४०० ते ५०० रुपयांचे भाडे द्यावे लागत होते. काहींनी कॅब करून घरचा रस्ता गाठला, तर काही जणांनी रिक्षाचा आधार घेतला. सामान्य प्रवासी मात्र दुकानाचा आडोसा घेत थांबून राहिला. पावसाची उघडीप झाल्यावर तो चालता झाला.

पावसाळा सुरू झाल्यावर कॅब कंपन्या दरांत वाढ करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. सामान्य दराच्या तुलनेत १५ टक्के वाढ करण्याचा अधिकार कॅब कंपन्यांना आहे. मात्र शनिवारी कॅबचालकांनी पुणेकरांना चांगलाच दणका दिला. सामान्यपणे शनिवार वाडा येथून डेक्कन जिमखान्यावर जाण्यासाठी कॅबचे दर १०० ते १५० रुपये आकारले जातात. शनिवारी पाऊस सुरू झाल्यावर मात्र हा दर ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर हडपसरपर्यंतचे दर १२०० पर्यंत होते.

स्विगी, झोमॅटोला एक तास

पावसामुळे घरात बसलेल्या पुणेकरांनी स्विगी व झोमॅटोवरून खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. मात्र डिलिव्हरीसाठी एक तास लागत असल्याचा संदेश संबंधित कंपन्यांकडून देण्यात आला. त्यामुळे पुणेकरांना वाट पाहत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Triple Murder Case: RSS नेत्याच्या तिहेरी हत्याकांडाचा थरारक Video; मुलानंतर वडिलांवर गोळीबार, मॅगझिन बदलून पुन्हा झाडल्या गोळ्या

Solapur District Bank: ‘सोसायटी’त ३ आमदारांसह ४ माजी आमदार रिंगणात; १० तालुक्यांतील उमेदवार निश्चित, माळशिरसचा तिढा कायम

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Marathi News Live Updates : प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत

Mumbai High Court: बारा वर्षे विभक्त राहणे हा छळच! घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT