Pune Rain sakal
पुणे

Pune Rain : पावसाळी वाहिन्या केबलच्या विळख्यात;महापालिका प्रशासनाकडून अखेर कारवाई सुरू

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पावसाळी वाहिन्यांमधून खासगी कंपन्यांच्या अनधिकृत केबल्सचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पावसाळी वाहिन्यांमधून खासगी कंपन्यांच्या अनधिकृत केबल्सचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनधिकृत केबल्समुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळा येऊन रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटना घडल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे संबंधित अनधिकृत केबल्स काढून टाकण्यावर महापालिका प्रशासनाकडून आता भर दिला जाणार आहे.

शहरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. रविवारी महापालिका प्रशासनाने पावसाळी वाहिन्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु. ल. देशपांडे उद्यान येथे पावसाळी वाहिन्यांमधून खासगी कंपन्यांनी अनधिकृतपणे केबल्स नेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळा अाल्याचे निष्पन्न झाले.

मलनि:स्सारण व देखभाल दुरूस्ती विभागाने संबंधित केबल काढून टाकल्या. याच रस्त्यावरील पाटील हॉस्पीटल, रांका ज्वेलर्स परिसर, ब्रम्हा गार्डन परिसर या ठिकाणीदेखील पावसाळी वाहिन्यांमध्ये केबल्सचे जाळे दिसून आले. पथ विभाग व मलनि:स्सारण विभागाच्यावतीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली. सोमवारपासून संबंधित केबल्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी केबल्स काढताना कर्मचाऱ्यांना वीजेचा धक्का बसत होता. त्यामुळे अन्य विभागांची मदत घेऊन केबल्सवर संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.

महापालिकेला उशिरा जाग का?

पावसाळी वाहिन्यांमधून केबल्स गेल्याचा प्रकार रस्त्यांवर पाणी तुंबल्यानंतर उघडकीस आला. त्यामुळे महापालिकेने नाले व पावसाळी वाहिन्यांच्या सफाईचा केल्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. पावसाळ्यापूर्वी पावसाळी वाहिन्यांची सफाई केली असती, तर तेव्हाच हा प्रकार निदर्शनास आला असता. आता हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे नाले, पावसाळी वाहिन्यांच्या सफाईबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळी वाहिन्यांमधून बेकायदेशीर केबल्स टाकल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित केबल सध्या काढून टाकण्यात आल्या आहेत. केबलच्या जाळ्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. हा प्रकार गंभीर असून, याबाबत पोलिसांकडे तक्रारही करण्यात येणार आहे.

-अनिरुद्ध पावसकर, पथविभागप्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT