Pune Rain News Sakal
पुणे

Pune Rain News : पूर्व आंबेगावातील काठापूर बुद्रुक परिसरात काल ढगफुटी एकाच दिवसात १५० मिलीमीटर पाऊस शेतीचे नुकसान

आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील काठापुर बुद्रुक व पारगाव परिसरात काल गुरुवारी ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस

सुदाम बिडकर

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील काठापुर बुद्रुक व पारगाव परिसरात काल गुरुवारी ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस झाला. यामुळे परिसरातील गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळाची एकच धावपळ उडाली.

या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला होता शेतात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते अनेक ठिकाणी शेतातील हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली तर काही शेतांचे बांध फुटले त्यामुळे संबधित शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले काल एकाच दिवशी १५० मिली मीटर एवढा गेल्या आठ वर्षातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला,

यावर्षी संपूर्ण हंगामात आज पर्यंत एकूण ३५५ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून त्यातील निम्मा पाऊस काल एकाच दिवसात पडला आहे तालुक्याच्या पूर्व भागातील इतर गावात असाच जोरदार पाऊस पडत राहिला तर दुष्काळाचे सावट दूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जानवत होता.काल गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाट सह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सहा वाजेपर्यंत पडत होता. त्यानंतर रिमझिम पाऊस पडत होता. या पावसाचा फायदा शेतातील पिकांना होणार आहे.

असाच पाऊस पडत राहिला तर डोंगर माथ्यावर व माळरानावर जळून गेलेल्या गवताला फायदा होणार असून जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. कालचा पाऊस काठापूर बुद्रुक ह्या एकाच गावात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस झाल्याने पावसामुळे शेतातील मका ,कडवाळ , हिरवे गवत, बीट,

पावसाळी बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आज शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी या परिसराची पहाणी करून संबधित शेतकर्यांशी संवाद साधला शासनाने संबधित शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्री. भोर यांनी केली आहे.यावेळी संदीप करंडे, बजरंग करंडे, अमोल करंडे, किशोर करंडे, रघुनाथ करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे उपस्थित होते.

चौकट- पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना येथील पर्जन्यमापकावर काल एकाच दिवसात १५० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे जून महिन्यात एकूण ५२.४५, जुलै- ५४.७५ , ऑगष्ट ५.८५ व सप्टेंबर महिन्यात आजपर्यंत एकूण २४१.९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४ सप्टेंबर २००५ ला एकाच दिवशी १७२.७२ मिलीमीटर एवढा उच्चांकी पाऊस झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT