प्रातिनिधीक फोटो esakal
पुणे

Pune Rain News : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी

सम्राट कदम

पुणे : शहरात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती. अखेरीस संध्याकाळी पेठांसह व उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अवकाळी पावसामुळे पुणेकरांना ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली.

पुणे शहरात मुख्य पेठांच्या परिसरासह पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री आठ वाजेनंतर सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली होती.

पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी (ता. १६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

काही वेळा पूर्वी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही भागात पावसासह वारे वाहतील तसेच यामुळे धूळ वाढण्याची शक्यता आहे असे सांगितले होते. तसेच शहरात दृश्यमानता कमी होईल त्यामुळे वाहन चालकांनी वाहने हळू चालवा असे अवाहन हवामान विभागाने केले होते.

म्हणून अवकाळी...

उत्तर तमिळनाडू ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिम बंगाल ते ओडिशा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.

पावसाचे अलर्ट :

गारपिटीसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे.

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, वर्धा, भंडारा, गोंदिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT