Pune Rain Update increase of one TMC water storage in four dams Crisis of water shortage  sakal
पुणे

Pune Rain Update : चार धरणात मिळून एक टीएमसीची वाढ; शहरात पाणी कपातीचे संकट

पडलेल्या पावसाचे पाणी खडकवासला, पानशेत व पूर्ण रिकामे झालेल्या टेमघर धरणात ५.५६ टक्के पाणी साठले आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळीत २७ जून रोजी सकाळी सहा वाजता ४.१६ टीएमसी म्हणजे १४.२६ टक्के पाणीसाठा होता. एक जुलै रोजी सकाळी सहा वाजता ५.१० टीएमसी तर १७.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. चार ही धरणात मिळून सुमारे एक टीएमसी म्हणजे ३.२४ टक्केने वाढ झाली.

सध्या शहरात पाणी कपातीचे संकट सुरू आहे. खडकवासला साखळीतील चारी ही धरण क्षेत्रात पाऊस पडत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी खडकवासला, पानशेत व पूर्ण रिकामे झालेल्या टेमघर धरणात ५.५६ टक्के पाणी साठले आहे.

यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील २४ तासात म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा पासून आज शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत टेमघर येथे ९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासल्यात नऊ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेतमध्ये ३१, वरसगावला ३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवसला धरणातील पाणी साठा

१ जुलै २०२३ सकाळी सहा वाजताची स्थिती-

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९२/१.००/५०.६३

पानशेत- १०.६२/१.,८०/१६.८७

वरसगाव- १२.८२/२.१०/१६.३७

टेमघर- ३.७१/०.२१/५.५६

चार धरणात मिळून एकूण ५.१० टीएमसी म्हणजे १७.५० टक्के पाणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT