Pune Rain 
पुणे

Pune Rain : ढगांच्या गडगडाटासह पुण्यात पावसाला सुरूवात...

Sandip Kapde

Pune Rain Update | पुणे : पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढच्या २४ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. केरळात मान्सून ४ जूनपर्यंत तर मुंबई अन् कोकणात ८ ते १० जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे.

दरम्यान मराठवाडा, विदर्भात येत्या २४ तासांमध्ये पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुण्यात काल शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. दरम्यान आज (मंगळवार) शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही परिसरात पाऊस देखील सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पावसाच्या हजेरीमुळे उकाडा थोडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT