Pune Rain Vishwajeet Pawar
पुणे

पुण्यात कोसळधार; ७ ठिकाणी पाणी शिरले

सकाळ डिजिटल टीम

एका ठिकाणी भिंत कोसळली, तर हडपसरमध्ये झाड कोसळले

Pune Rain Update

पुणे : शहरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. याबरोबरच हडपसर येथील आकाशवाणी परिसरात एका झाड कोसळल्याची घटना घडली. तर एका ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शहरात सोमवारी रात्री साडे नऊ वाजता मुसळधार पावसास सुरू झाला. कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता,रास्ता पेठेतील दारुवाला पुलाजवळ, सुखसागर नगर, डॉल्फिन चौक,  बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर आणि हडपसरमधील गाडीतळ परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, याबाबत खबर मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोचून मदत केली.

तर पर्वती येथील रमणा गणपती मंदिराजवळ एक भिंत कोसळली, सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होती. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले होते. अनेक दुचाकी, रिक्षा यावेळी पाणी गेल्याने बंद पडल्या. त्यामूळे वाहन वाहन चालकांवर वाहने पाण्यातून ढकलत नेण्याची वेळ आली.

दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर सोमवार पेठेत एका ठिकाणी मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली.

...आणि अशी मिळाली नागरिकांना मदत

मुसळधार पावसामुळे अनेक वाहनचालक ठिकठिकाणी अडकून पडले होते, त्यांना स्थानिक नागरिक, गणेशोत्सव मंडळे व सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात दिला. गुडघाभर पाण्यातून वाहने बाहेर काढता येत नसल्याने नागरिकांनी वाहनचालकांना पाण्यातून बाहेर काढले, तसेच ज्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत करण्यासाठी मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप, फेसबुक अशा समाज माध्यमांवर प्रसारित केले. त्यामुळे काही नागरिकांना चांगलीच मदत झाली. तर रात्री कामावरून सुटलेल्या तसेच छोटे मोठे व्यवसाय बंद करून घरी निघालेले नागरिकांना हि पावसाचा फटका बसला. त्यांनी पाऊस थांबेपर्यंत आहे त्याच ठिकाणी थांबणे पसंत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT