Pune Rain Sakal
पुणे

Pune Rain : प्रलयकारी पावसाने प्रशासनाला खडबडून जाग; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

पावसाच्या हाहाकारानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये काल प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामध्ये पुणेकरांचे अक्षरशः हाल झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे रेल्वे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं. या परिस्थितीची दखल घेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहे.

काल पुण्यात झालेल्या पावसाने पुणेकर हैराण झाले आहेत. या पावसाविषयी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "काल पुण्यामध्ये पाऊस झाला, ढगफुटी झाली. सकाळी सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिसांशी माझं बोलणं झालं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोलत आहे."

आपण चौकशीचे आदेश दिले असल्याचं सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी अधिकाऱ्यांशी सध्या बोलत आहे. कालचा पाऊस नेहमीपेक्षा खूप जास्त होता. नियोजन बैठकीत चर्चा झाली आहे. मी आदेश दिले आहेत. पाण्याचा निचरा का होत नाही, पावसाचे पाणी वाहून नेणारी पाईपलाईन चोकअप झाली आहे का? याची चौकशी केली जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: आऊट की सिक्स? इशान किशनचा शॉट अन् ऍलेनची भन्नाट फिल्डिंग, पण थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद

Latest Marathi News Update : नांदेडमध्ये १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दाखवा, वर्षभर शर्ट घालणार नाही; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना तरुणाचे थेट आव्हान

Crime: रक्षकच बनले भक्षक! १६ वर्षीय मुलीवर पोलीस ठाण्यातच PIकडून अनेकदा अत्याचार; गुन्हा दाखल

पंजाबमध्ये निवडणुकीआधी 'आप'ला धक्का, २ आमदारांनी दिला राजीनामा; कारण आलं समोर

कोण आहेत वृंदावनातील Gen Z बाबा? १९व्या वर्षी बनले भागवत कथावाचक, सोशल मीडियावर होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT