Khadakwasla Dam Sakal
पुणे

Pune Rain: खडकवासला पूर्ण क्षमतेने भरले; मुठा नदीत विसर्ग सुरू

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आज पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० % भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये संध्याकाळी ०७ वाजता ८५६ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्री ८ वाजता हा विसर्ग वाढवण्यात येणार असून २,५६८ क्यूसेक करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये कमी जास्त बदल केला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

(Pune Rain Updates)

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन ते तीन तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. शहरात गेल्या तीन तासापासून पाऊस चालू असल्याने शहरातील काही घरात पाणी घुसले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन तासात कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे शहरातील 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या नोंदी असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत आहेत. दरम्यान, पावसामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT