पुणे

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

सकाळ डिजिटल टीम

पुणेः अवकाळी पावसाचा जोर वरचेवर वाढत चालला आहे. पुण्यामध्ये सोमवारी पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचलं होतं, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे रामटेकडी परिसरात पत्रेदेखील उडाले आहेत.

सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील घोरपडी, रामटेकडीमध्ये प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे झाडे कोसळली तर झोपडपट्टी भागातील काही रहिवाशांच्या घरावरील छत उडून गेले आहेत. यासह सिंहगड रस्ता परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरातील सिद्ध हनुमान मंदिराची भिंत पडून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. इथेही झाडे मुळासहीत उन्मळून पडले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर ते डॉ हेलन केलर रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने रस्ता बंद झालेला आहे.

झाड कोसळल्यामुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली असून बघ्यांची गर्दी झाली आहे. आठ माल वाहतूक व एका रिक्षा चालकाचे नुकसान झाले आहे. या भागात राहणाऱ्या उमेश भोसले यांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे. पुणे महानगरपालिका व अग्निशमन दलाकडून एकही कर्मचारी अथवा सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहचली नाही.

रामटेकडी परिसरात विजेच्या वायरवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रामटेकडी परिसरात अंदाजे तीस झाडे पडली असून रहिवाशांची धांदल उडाली आहे. चांदणे, बगाडे या दोन रहिवाशांच्या घरावर झाड पडल्याने दोघांचेही घरं पडली आहेत. याच त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

रामटेकडी परिसरात अंदाजे तीस झाडे पडल्याची माहिती आहे. दुसरीकडे एम्प्रेस गार्डनजवळ एक मोठे झाड एका चारचाकीवर पडल्यामुळे वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. यासह बीटी कवडे रस्त्यावरील ससाणे उद्यान समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. अनेक दुचाकी व रिक्षा बंद पडल्याने नागरिकांना वाहने ढकलत नेण्यासाठी कसरत करावी लागली.

घोरपडीमधील भीम नगर जवळ मुख्य रस्त्यावर शिर्के कंपनी भिंती जवळ खोलगट भाग असल्याने या परिसरात पाणी साचले आहे. यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने येथे अपघात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT