Pune Rains 2024 Esakal
पुणे

Pune Rain: अतिमुसळधार पावसाने झोडपले! मध्यरात्री पीएमसी पुणेकरांच्या मदतीला; जारी केली आपत्कालीन हेल्पलाइन, पर्यटकांनाही इशारा

PMC Helpline: याचबरोबर आपत्तीजन्य परिस्थितीत पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पुढील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या 24 हून अधिक तासांपासून पुणे आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, महानगर पालिकेने पुणेकरांना इशारा देत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

मध्यरात्री दोन वाजत पुण महानगरपालिकेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत पुणेकरांना इशार दिला आहे.

आपल्या पोस्टमध्ये पुणे महानगर पालिकेने म्हटले आहे की, " महत्त्वाची सूचना खडकवासला धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आज, २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ वाजता वाढवण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी."

याचबरोबर आपत्तीजन्य परिस्थितीत पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पुढील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेल्पलाइन

020 - 25501269

020 - 25506800

भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंट, पवना धरण, कुंदमळा परिसर भेट देणे टाळा

दरम्यान पुण्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशात नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

यासह मुळशी आणि मावळ परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे. अशात मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पर्यटकांसाठी इशारा देत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पर्यटकांनी भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंट, पवना धरण, कुंदमळा परिसर या ठिकाणांना भेट देण्याचे टाळावे असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

पुण्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचे व्हिडिओ आणि फोटो अनेक युजर सोशल मीडियावर शेअर करत असून, शहरातील अनेक भागात पाणी साचले असल्याचे दिसत आहे.

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर संततधार सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT