hanumant phadke 
पुणे

Pune Rains : पाण्याने नागरिकांच्या छातीची उंची गाठली अन्...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बुधवारी रात्री सुरू झालेल्या धुवाधार पावसामुळे सर्व शहर घरामध्ये पाय दुमडून झोपी जायच्या तयारीत होते. तेव्हाच दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा वस्तीमध्ये रात्री साडेनऊला पुराचे पाणी शिरले आणि बघता बघता याच पाण्याने नागरिकांच्या छातीची उंची गाठली. वस्तीमधील नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने उंचावर धाव घेतली. क्षणार्धात डोळ्यांसमोर दिसणारे संसार, घरे, धान्य आणि पाहिलेली स्वप्ने पाण्याखाली गेली. येथील सर्व्हे नंबर 133 मध्ये राहणारे हनुमंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहा लोकांचे प्राण वाचविण्यात यश आले.

शेजारील ओढ्याची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे पाण्याची पातळी 20 फुटांपर्यंत वाढत गेली. वस्तीमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या वृद्ध महिलांना फडके आणि त्यांच्या मित्रांनी पाठीवर उचलून बाहेर काढले. तसेच, पाण्याच्या रौद्र प्रवाहातही राजकीय पक्षाच्या पाटीला घट्ट पकडून रात्रभर उभी असलेली युवती आणि घराच्या छतावर रात्रभर भिजणाऱ्या युवकाला वाचविण्यात त्यांना यश आले. घटनेचा थरार सांगताना फडके म्हणाले, "उराला भिडलेल्या पाण्यात वाट काढत आम्ही मित्रांनी लोकांना बाहेर काढले. अंगात असलेल्या कपड्यानिशी लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. कुणाच्या घरात लग्नासाठी साठविलेले पैसे होते, तर कुणाच्या घरात वर्षभराचे धान्य. नागरिकांनी एकमेकांची मदत केली. परंतु, घटना घडल्यानंतरही दुपारी एकपर्यंत प्रशासनाचा कोणताही कर्मचारी इकडे फिरकला नाही.''

"या कालावधीत लोकांना प्यायला पाणी आणि चिमुरड्या बालकांना खायला अन्न नव्हते. शेजारील साने गुरुजी स्मारकात प्रियांका सोनावणे यांच्या मदतीने नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. या पुरामुळे जवळजवळ शंभर घरांमध्ये गुडघाभर चिखल साचला आहे.''
- दीपक म्हस्के, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT