इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे sakal
पुणे

पुणे : राज ठाकरेंकडून इतिहासाची मोडतोड

इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली आणि तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेशी आम्हाला देणे घेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्याही राजकीय पक्षाने वापरु नये, त्याला आमचा आक्षेप आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे इतिहासाची मोडतोड करत आहेत, अशी टीका इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केली.

कोकाटे म्हणाले, " राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावर मुद्रा वापरली आहे. त्याला आमचा विरोध आहे. जबाबदार नेता असतो, त्याने अभ्यासपूर्ण बोलायला हवे. जाती जातीत तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचं लक्षण नाही. राज हे पुरंदरे, टिळक यांचे समर्थन करतात. यातून त्यांची आयडॉलॉजी स्पष्ट होते. ते पुरंदरे प्रेमात अडकले आहेत, त्यांना इतर काही समजून घायचे नाही. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा एक दगडही रचला नाही. याउलट शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी स्मारकाच्या कामासाठी वापरला नाही. राज ठाकरे हे जातीयवादी असून टिळक आणि पुरंदरे यांचे समर्थन करतात. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो."

शिवचरित्राची मोडतोड करणाऱ्यांना पाठिंबा देणे हा राज ठाकरे यांचा शिवद्रोह आहे. राज हे बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन करतात. ते शिवप्रेमींच्या नाही तर जेम्स लेनवादींच्या बाजूने उभे राहिले. महात्मा फुले यांनी शिवसमाधीचा शोध लावला आणि शिवजयंतीला सुरुवात केली. त्यांनी ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला. छत्रपती शाहू महाराजांनी शिवस्मारकाची निर्मिती केली.

- इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT