kaka pawar& pravin tarde sakal
पुणे

Pune : प्रवीण तरडे व काका पवार यांना "राजीव गांधी पुरस्कार"जाहीर

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात तरडे यांना माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रियांका महिला उद्योग संस्था व वसंतदादा सेवा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा "राजीव गांधी कला गौरव पुरस्कार" लेखक,दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांना, तर "क्रीडा गौरव पुरस्कार" अर्जुन पुरस्कार विजेते पहिलवान काका पवार यांना देण्यात आला आहे.

वसंतदादा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. 11 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात तरडे यांना माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, "सरहद"संस्थेचे संजय नहार उपस्थित राहणार आहेत.

तर 31 मे रोजी नेहरू स्टेडियम येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमांत पहिलवान काका पवार यांना आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी विकी बनकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT