रमजान ईद sakal
पुणे

पुणे : समतेचा संदेश देत खडकवासला परिसरात रमजान ईद साजरी

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील मस्जिद मध्येही ईद शांततेत साजरी करण्यात आली

निलेश बोरुडे

किरकटवाडी: समतेचा संदेश देत खडकवासला येथील बिलाल मस्जिद मध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील मस्जिद मध्येही ईद शांततेत साजरी करण्यात आली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्हीही मस्जिद परिसरात हवेली पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. खडकवासला येथील मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व आजुबाजूच्या परिसरातील सुमारे दोन हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली.

गावातील इतर जातीधर्मांचे नागरिकही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. मुस्लिम व हिंदू बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना अक्षयतृतीया व रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. बिलाल मस्जिद ट्रस्टच्या वतीने हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नूर सय्यद, जब्बार शेख, आसिफ शेख, तन्वीर शेख, अफरोज खान, सलीम शेख, रज्जाक शेख, मोहम्मद रफीक सुतार,अजहर तिगडी,सोहेल शेख,दादा शेख, फिरोज खान, आनंद मते, विलास मते आदी उपस्थित होते.

"ही शिवकालीन मस्जिद आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही येथे शांततेचा भंग झालेला नाही. यापुढेही हीच परंपरा कायम राहील. परिसरातील इतर धर्मीयांशी आमचे पिढ्यानपिढ्या सलोख्याचे संबंध आहेत. सर्वत्र शांतता नांदावी हीच इच्छा आज आम्ही व्यक्त केली आहे." नूर सय्यद, अध्यक्ष बिलाल मस्जिद ट्रस्ट, खडकवासला.

"कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून हवेली उपविभागात काटेकोर नियोजन करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परिसरात असलेल्या मस्जिद मध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कसल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. अशा समाजकंटकांची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी. सामाजिक ऐक्य व सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा." भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

Whatsapp New Feature : तुमच्या पालकांना कळणार तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये काय करताय; आलं Parental Control फीचर, कसं वापरायचं पाहा

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

SCROLL FOR NEXT