Jobs
Jobs Sakal
पुणे

रोजगार देण्यात पुण्याचा दुसरा क्रमांक

सम्राट कदम

पुणे - नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात देशात बंगळूरनंतर पुण्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. २०२० च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा ४० टक्क्याने रोजगाराच्या इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, तर कित्येकांना गावाकडे परतावे लागले होते. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मात्र राष्ट्रीय स्तरावर ४४ अंकांनी रोजगाराचा इंडेक्स वाढल्याचे ‘मॉन्स्टर’ संस्थेने म्हटले आहे. ही वाढ प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, वाहतूक या क्षेत्रातील नोकऱ्यांच्या बाबतीत पाहायला मिळाली. तुलनेने शिक्षण, अभियांत्रिकी, बांधकाम आदी क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी नसल्यात जमा आहे. पुण्यातील आयटी क्षेत्राचा उत्पादन, सेवा आणि निर्यात क्षेत्राला फायदा झाला आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित राहिली तर पुढील सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे निष्कर्ष

  • मागील सहा महिन्यांत रोजगाराच्या इंडेक्समध्ये सरासरी पाच टक्के वाढ

  • जुलै आणि ऑगस्ट २०२१ मधील नव्या रोजगार संधींची वाढ स्थिर

  • सर्वच शहरांत आयटी, सॉफ्टवेअरशी निगडित रोजगार वाढले

  • वरच्या पदांवरील किंवा व्यवस्थापकीय जबाबदारीतील नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक भरती

  • जानेवारी २०२१ पासून रोजगाराचा इंडेक्स वाढत आहे.

कोरोनाचे वाढते लसीकरण, सण-उत्सव आदींमुळे पुण्यातील आयटी क्षेत्राबरोबरच उत्पादन आणि वाहतूक क्षेत्रातील नव्या रोजगार संधींनी चांगली वाढ नोंदवली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या बाबतीत तरी रोजगारातील ही वाढ अशीच राहील, असा विश्वास वाटतो.

- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT