corona active patients 
पुणे

सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे राज्यात तिसऱ्या स्थानी

जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण : मुंबई पहिल्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत १ हजार ४२६ ने वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ५८३ झाली आहे. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांत पुणे राज्यात तिसऱ्या स्थानावर आले आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे यामध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यात एकाच आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ६६.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी (ता.२८) राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. या अहवालात सध्या कोरोना रुग्णांच्या अनुक्रमे पहिले पाच जिल्हे, राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्ण, गेल्या आठवड्यातील (ता. १४ ते २० जून) जिल्हानिहाय कोरोना रुग्ण आणि चालू आठवड्यातील (ता. २१ ते २७ जून) जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी देण्यात आली आहे.

पहिल्या तीन जिल्ह्यात ८२.५३ टक्के सक्रिय रुग्ण

सद्यःस्थितीत राज्यात एकूण २६ हजार ९३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी राज्यातील सर्वाधिक संख्येनुसार पहिल्या पाच जिल्ह्यात मिळून २४ हजार ७८४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी मुंबई, ठाणे आणि पुणे या पहिल्या तीन जिल्ह्यात मिळून २२ हजार २२६ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या तुलनेत पहिल्या तीन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची टक्केवारी ही ८२.५३ टक्के इतकी आहे. सध्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ४६.३४ टक्के रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात २२.८९ टक्के तर, पुणे जिल्ह्यात १३.३० टक्के कोरोना रुग्ण आहेत.

पहिल्या पाच जिल्ह्यातील जिल्हानिहाय रुग्ण

मुंबई --- १२ हजार ४७९

ठाणे --- ६ हजार १६४

पुणे --- ३ हजार ५८३

रायगड --- १ हजार ८७३

पालघर --- ६८५

दहापेक्षा कमी रुग्णांचे तीन जिल्हे

दरम्यान, राज्यातील बीड, नंदूरबार आणि गोंदिया या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दहापैकी कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ चार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जिल्हानिहाय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT