Crime
Crime esakal
पुणे

Pune Crime : शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - शासकीय विश्रामगृहात महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचा सांभाळ करतो. तसेच लग्नाचे आमिष देत चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादेत नमूद आहे.

या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), त्याचे साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत २०१२ पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. खंदारे हे शिवसेना-भाजप युतीसरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले व त्यांच्या मुलाचा सांभाळ करतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी नकार दिला असता त्या पळून जाऊ नये, म्हणून त्याने फिर्यादीस विवस्त्र करून मारहाण केली. ही बाब कोणाला सांगितल्यावर खंदारे व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मुलाच्या संगोपनासाठी दिलेले धनादेश वटलेच नाही -

बलात्कारातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या होत्या. त्यांना मुलाला जन्म दिला आहे. या मुलाच्या संगोपनासाठी खंदारे याने आर्थिक तरतूद म्हणून फिर्यादी यांना काही धनादेश दिले होते. परंतु ते वटले नाहीत. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT