पुणे, ता. १५ ः विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे पुस्तकांशी थेट नाते जोडले जावे, या उद्देशाने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण रविवारी उत्साहात झाले. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ ग्लोबल लिट फेस्ट’च्या निमित्ताने ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) द्वारे ही स्पर्धा झाली.
अभिवाचन स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले. उच्चार व स्पष्टता, भावाभिव्यक्ती, गती व विराम, आशयाचे आकलन तसेच मंचावरील सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले असून, विजेत्यांना स्मृतिचिन्हासह ‘सकाळ’ प्रकाशनाची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी जनसंपादक अंकित काणे, नवीन उपक्रम प्रमुख हेमंत वंदेकर आणि ‘सकाळ प्रकाशन’चे प्रमुख आशुतोष रामगिर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गट, महाविद्यालयीन गट तसेच शालेय शिक्षक गट असे विभाग करण्यात आले होते. प्रत्येक गटात मराठी आणि इंग्रजीसाठी स्वतंत्र विभाग होते. जिल्हास्तरीय फेरीत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
-----
फोटो ः 66032
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.