Pune residents kept Corona under control by Following Safety Measures properly
Pune residents kept Corona under control by Following Safety Measures properly 
पुणे

वेल डन पुणेकर, तुम्ही कोरोनाचा थोपवलंय; काळजी घ्यावीच लागणार!

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनी लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने कोरोनाबाधितांची संख्या रोखली. अन्यथा सांख्यिकी प्रारुपाप्रमाणे 15 जूनपर्यंत पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या चाळीस हजारांवर पोचली असती.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईसह राज्यभरात हजारों रुग्णांचा टप्पा महिन्याभरातच ओलांडला गेला. त्या वेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रिव्हेंटीव्ह अँण्ड सोशल मेडिसीन (पीएमएम) विभागातर्फे सांख्यिकी प्रारुपाच्या आधारावर 15 जूनपर्यंतचा अंदाज वर्तविला होता. त्यात ‘बेस्ट’ आणि ‘वर्स्ट ’ अशी वर्गवारी केली होती. अर्थात त्या वेळी लॉकडाऊनला नुकतीच सुरवात झाली होती. कशा प्रकारे लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल, याची निश्चित दिशा नव्हती. अशा पार्श्वभूमीवर हा कोरोनाच्या रुग्णसंख्या कशा पद्धतीने वाढेल, याचा शास्त्रीय पद्धतीने वेध घेतला होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पुण्यात 15 जूनपर्यंत किमान (बेस्ट) 40 हजार रुग्णांची नोंद होईल, असे भाकित होते. पण, पहिल्या लॉकडाऊनपासूनच पुणेकरांनी प्रशासानातर्फे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. घराबाहेर न पडणे हा त्यातील सगळ्या मोठा भाग होता. लाखो पुणेकर दिवस-दिवस घरात बसले. बदलत्या काळात त्यांनी आपल्या दिनक्रमात बदल केला. वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य दिले. सर्व व्यवहार आँनलाइनने केला. शक्यतो घराबाहेर न पडणे हे धोरण पुणेकरांना कसोशीने पाळले. त्यामुळे पुण्यात सांख्यिकी प्रारुपानुसार पुढे आलेल्या संख्येपेक्षा प्रत्यक्षातील रुग्णसंख्या कमी ठेवण्यात यश आले. 
बाहेर पडताना मास्क, सॅनियझर आणि वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुणे, नाक, तोंड, डोळ्याला स्पष्ट न करणे अशा सवयी अंगवळी पाडल्या, त्याचा हा दृष्य परिणाम असल्याचे मत पीएसएमच्या डॉक्टरांनी व्यक्त केले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात मेमध्ये सर्वाधिक रुग्णांचे निदान झाले. मात्र, यात कोरोनाच्या संसर्ग झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सात हजारांपर्यंत मर्यादीत ठेवण्यात यश आले. याचे सर्व श्रेय पुणेकरांना जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT