PMC Reserve Tempo 
पुणे

Pune Reverse Tempo: हडपसरमध्ये उड्डाणपुलावर थरार! पुणे महापालिकेचा टेम्पो ड्रायव्हरविना रिव्हर्सगियरमध्ये सुसाट

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गेल्या काही दिवसांत आपण अनेक भीषण अपघात पाहिले आहेत. निर्दयीपणे गाड्या चालवल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. पण तरीही रस्त्यावर आणलेल्या वाहनांच्या चालकांनी अद्याप या घटनांमधून कुठलाही धडा घेतलाला दिसत नाही. कारण असाच एक थरारक प्रकार पुण्यातील हडपसर भागात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाण पूलावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची चार चाकी गाडी म्हणजे टेम्पो ड्रायव्हर नसतानाही रिव्हर्स गियरमध्ये वेगानं पाठीमागे जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या टेम्पोवर पुणे महानगर पालिका असं लिहिलेलं आहे. तसंच यामध्ये ड्रायव्हरच्या जागेवर कोणीही व्यक्ती दिसत नाहीए. अत्यंत भयानक आणि जिवेघेणा असा हा व्हिडिओ आहे.

ही घटना रविवारी रात्री ११.४५ वाजता घडल्याची माहिती साम टिव्हीच्या सुत्रांकडून मिळते आहे. पण हा टेम्पो अशा प्रकारे रिव्हर्स का जात आहे, हे समजू शकलेलं नाही. मात्र, मध्य रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वाहनं कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. अखेर हा टेम्पो डिव्हायडर धडकल्यानं थांबला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT