पुणे

आधी मोबदला ठरवा, मगच मोजणी करा

CD

कात्रज, ता. १७ : महापालिकेच्या ६५ मीटर इनर रिंगरोडसाठी गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि आंबेगाव परिसरात प्रस्तावित रस्त्याच्या मोजणीला बाधित जागामालकांनी तीव्र विरोध केला. मोबदला निश्‍चित केल्याशिवाय मोजणी करू देणार नाही, या भूमिकेमुळे मोजणीचे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास महापालिका, ‘पीएमआरडीए’ आणि महसूल विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले होते. यावेळी सुमारे २०० ते २५० नागरिक एकत्र आले. सरकारने जागा आणि बांधकामाचे दर निश्‍चित न करता आम्हाला अंधारात ठेवू नये, अशी मागणी नागरिकांनी केली. या प्रश्‍नावर वरिष्ठ स्तरावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणीही केली. संभाव्य तणाव लक्षात घेता भारती विद्यापीठ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रश्‍नावर शुक्रवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणारी संयुक्त मोजणीही नुकसानभरपाईच्या स्पष्टतेअभावी रद्द झाली होती. ११ नोव्हेंबरच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी संमती दिली होती, मात्र अद्याप स्पष्टता नसल्याने मंगळवारी पुन्हा विरोध करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांची अंमलबजावणी नाही :
११ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत २०१३ च्या कायद्यानुसार खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीचे मूल्यांकन करण्याचे स्पष्ट केले होते. भूमिहीन होणाऱ्यांना आवास योजनेतून घर देण्याचे प्रस्ताव देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात काहीही कार्यवाही न झाल्याने विरोध केल्याचे नागरिक नितीन जांभळे यांनी सांगितले.

‘‘नागरिकांनी विरोध केल्याने मंगळवारी मोजणी थांबवावी लागली. आता जागामालक आणि प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल.’’
- विकास फुके, मंडळ अधिकारी, भूसंपादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ४८ प्रश्नांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मागणी

MPSC Group C Exam : एमपीएससी गट-क परीक्षार्थींना दिलासा; आरक्षणाचे दावे बदलता येणार, नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

Encroachment Crime : गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई; अतिक्रमणमुक्त परिसर ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक

Amravati Farmers : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; अमरावती जिल्ह्यात नमो निधीचे तीन हप्ते रखडले

Vande Bharat Sleeper : इडली-डोशानंतर आता वंदे भारतमध्ये पुरणपोळी! आयआरसीटीसीचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT