पुणे

पुणे रिंगरोडच्या ‘पूर्व’चा विस्तार होणार

CD

पुणे, ता. १८ : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने आज मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १० हजार ५०२ कोटी ३६ लाख रुपयांचा सुधारित खर्च मंजूर करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी ते पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे-शिवरे हा ३१.८०५ किलोमीटरचा मार्ग या प्रकल्पामध्ये आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या रस्त्याचे काम करण्यात येणार असून, जून २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. त्यात रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला मंजुरी देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोरतापवाडी ते वरवे-शिवरे मार्ग ः
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा या रिंगरोडचा मुख्य उद्देश आहे. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतूक पुणे शहरातून न जाता शहराबाहेरून वळविण्यात येणार आहे. संपूर्ण १६८.९८१ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडची सलगता पूर्ण झाल्यानंतर ही बाह्य मार्गिका पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. सोरतापवाडी ते वरवे-शिवरे मार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असतील. या रस्त्यावर ताशी १२० किलोमीटर वेगमर्यादा असेल.

चार बोगदे, १८ उन्नत मार्ग ः
या मार्गावर एक वाहतूक बदल केंद्र, तीन मोठे पूल, पाच लहान पूल, १८ उन्नत मार्ग किंवा उड्डाणपूल आणि चार बोगदे असतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच वाहतूक बदल केंद्राजवळ सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT