Pune Ring Road sakal
पुणे

Pune Ringroad Fund : भूसंपादनाअभावी रिंगरोडचा निधी परत जाणार?

पुणे शहराभोवतालच्या चक्राकार वळण मार्गाच्या (रिंग रोड, पश्चिम) भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराभोवतालच्या चक्राकार वळण मार्गाच्या (रिंग रोड, पश्चिम) भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे.

पुणे - पुणे शहराभोवतालच्या चक्राकार वळण मार्गाच्या (रिंग रोड, पश्चिम) भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. पश्चिम हवेलीतील जमीनमालक आणि शेतकऱ्यांकडून प्रशासनाने पुन्हा जमिनीची कागदपत्रे आणि अर्ज मागविले आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे. मार्चअखेर ३ हजार १०० कोटींचा निधी वितरित न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम मार्गावरील रिंग रोडच्या भूसंपादनासाठी २६ ऑगस्ट २०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीला मान्यता मिळाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राबविण्याचा निर्णय घेतला होता.

भूसंपादनासाठी जमीन मालकांना दुप्पट मोबदला देण्याबाबत अधिसूचना काढली. रिंग रोड पश्चिमच्या भूसंपादनासाठी गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली. जमीन मालकांनी प्रशासनाला कागदपत्रेही दिली. तरी पुन्हा कागदपत्रे, अर्ज मागविल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेस विलंब होणार आहे. परिणामी, प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या पदरात न पडल्यास तो परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फेब्रुवारीत निवड प्रक्रिया

पश्चिम भागातील रिंग रोडचे काम फेब्रुवारी २०२३ मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरू केले जाईल. हे काम येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात दिले होते. परंतु, फेब्रुवारी उजाडला तरी भूसंपादन प्रक्रिया धीम्यागतीने सुरू आहे.

पश्चिम रिंगरोड

  • ६८.८० किलोमीटर उर्से ते वरवे बुद्रुक

  • १२,१७६ कोटी रुपये रस्ते बांधकाम खर्च

  • ३१०० कोटी रुपये भूसंपादन व इतर खर्च

शेतकऱ्यांकडून पुन्हा अर्ज मागविले नाहीत. भूसंपादनासाठी पुढील आठवड्यात मालमत्तांचा निवाडा (अवॉर्ड) जाहीर होईल. त्यानंतर १५ दिवसांत संबंधित शेतकरी, जमीन मालकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दराबाबत माहिती देण्यात येईल. त्यांची सहमती मिळाल्यानंतर अंतिम निवाडे केले जातील. तसेच, सहमती न देणाऱ्या खातेदारांच्याही जमिनी अधिग्रहित करणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया मुदतीत पूर्ण होणार आहे.

- संजय आसवले, उपविभागीय अधिकारी, हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT