pune sakal
पुणे

Pune : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे भिषण अपघात

एअरबॅग उघडल्याने जीवीत हानी टळली, पोलीसांना मात्र माहितीही नाही

निलेश बोरुडे

सिंहगड : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत संत धर्माजी महाराज मंदिरापासून काही अंतरावर पुलाच्या कठड्याला धडकून कारचा भिषण अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारची पुढची दोन्ही चाके, इंजिन व इतर भाग तूटून बाजूला पडले होते. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने जीवीत हानी झालेली नाही. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे जवळच असलेल्या हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले.

डोणजे बाजूकडून पुण्याकडे येत असताना हा अपघात झाल्याचे दिसून येत असून अपघाताच्या अगोदर सुमारे चाळीस ते पन्नास मीटर अंतरापासून कार मुख्य रस्ता सोडून बाजूने येऊन पुलाच्या सिमेंट कॉंक्रिटच्या कठड्याला जोरात धडकली आहे. अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या हॉटेलचे सुरक्षारक्षक मदतीसाठी धावले. सुरक्षारक्षकांनी गाडीत अडकलेल्या एकाची सुखरूप सुटका केली.

रविवार असल्याने सकाळपासूनच पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ सुरू आहे. येणारी-जाणारी वाहने थांबवून नागरिक अपघातस्थळी पाहण्यासाठी गर्दी करत होते. कारची अवस्था पाहून नागरिक अपघाताच्या तीव्रतेबाबत चर्चा करताना दिसत होते. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने व सुरक्षारक्षक वेळीच मदतीसाठी धावल्याने या अपघातात जीवीत हानी झालेली नाही.

पोलीसांना माहितीच नाही...... एवढा मोठा अपघात घडला असताना व चारचाकी पुलावर अडकलेली दिसत असताना पोलिसांना मात्र या अपघाताबाबत कोणतीही माहिती नव्हती. हवेली पोलीसांची रात्रगस्तीची गाडीही तेथून गेली मात्र त्यांनाही काही दिसले नाही. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता कोणीही खबर दिलेली नसल्याचे तसेच जखमींबातही कोणत्याही रुग्णालयाकडून एमएलसी आलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT